+918048053816
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

६ वा वर्धापनदिन २६ जानेवारी २०१६ रोजी तत्कालीन मा. उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या हस्ते शतायु हॉस्पिटल चे उद्घाटन झाले आणि सुरू झाला एक प्रवास...एक प्रवास रुग्णसेवेचा ! अतिशय मूलभूत व अत्यावश्यक सोयी- सुविधांनी युक्त असे चालू केलेल्या हॉस्पिटल आता ७ व्या वर्षात पदार्पण करत आहे ते केवळ वडीलधार्यांचा आशिर्वाद, हितचिंतकांच्या शुभेच्छा, स्टाफ व सहकारी डॉक्टरांचे सहकार्य व रुग्णांचा विश्वास ह्यामुळेच. आता हळूहळू इतर ही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुग्ण केंद्रित व सर्वसामान्यांना परवडतील अशा वाजवी दरात शक्य तितकी उत्तम आरोग्यसेवा मिळावी हे नेहमीच शतायु हॉस्पिटलचे ध्येय राहीले आहे व ते पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटल डॉक्टर्स व इतर स्टाफ अहोरात्र झटत असतात. गेल्या २ वर्षापासून संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोविड महामारीच्या काळात देखील कोविड व नॉन-कोविड रुग्णांवरील उपचारांमध्ये खंड पडू दिला नाही. मागील ६ वर्षां मध्ये सर्वसामान्यांसाठी मोफत रुग्ण तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत हिमोग्लोबीन, रक्त शर्करा, रक्तदाब, इ सी जी शिबीर, मोफत हाडांची घनता शिबीर अशा अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हॉस्पिटल डॉक्टर्स व स्टाफ व्यतिरिक्त विविध तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्यामुळेच हा इथपर्यंतचा प्रवास सहजशक्य झाला. त्याबद्दल मी मेडिसिन विभागाचे डॉ नितीन पाटील, डॉ विवेक चव्हाण, डॉ केविन बोरा, डॉ पंकज मगर, सर्जरी विभागाचे डॉ हृषीकेश कुलकर्णी, डॉ सुरेश नाईक, ऑर्थोपेडिक विभागाचे डॉ सचिन नागापूरकर , डॉ प्रीतम पालकर, डॉ विजय शिंदे, स्त्रीरोग विभागाचे डॉ पल्लवी जोशी, डॉ सुजित शिंदे, डॉ निकिता पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ आकाश चिडगोपकर , मानसोपचारतज्ज्ञ डॉ सुमित चांडक, मूत्र विकारतज्ञ डॉ संदेश सुराणा, फिजीओथेरपिस्ट डॉ अश्विनी सावळे त्वचा विकार तज्ञ डॉ नितीन चौधरी कॅन्सर विकार तज्ञ डॉ महेश संभूस हृदय विकार तज्ञ डॉ ऋतुपर्ण शिंदे, डॉ अभिजीत पळशीकर आमचे गुरूवर्य डॉ विकास बेडके व डी एम एस डायग्नोस्टिक चे डॉ परशुराम सुर्यवंशी ह्या सर्वांचा मी आभारी आहे .